esakal | माजलगाव तालुक्यात खाद्यतेल युनिटला आग, लाखो रुपयांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

माजलगाव तालुक्यातील  खाद्य तेलाच्या युनिटला आग

माजलगाव तालुक्यात खाद्यतेल युनिटला आग, लाखो रुपयांचे नुकसान

sakal_logo
By
कमलेश जाब्रास

माजलगाव (जि.बीड) : शहरापासून जवळच असलेल्या फुले पिंपळगाव येथील नवीन मोंढ्यातील तेल पॅकिंग करणाऱ्या युनिटला आज गुरुवारी (ता.१५) पहाटे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग चार तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आली आहे. यात कसल्याही प्रक्रारची जीवितहानी झालेली नाही.

या बाबत माहिती अशी की, नवीन मोंढ्यात महावीर ट्रेडिंग कम्पनी संतोष अब्बड यांच्या मालकीची तेल कम्पनी आहे. आज पहाटे चारच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत पॅकिंग साहित्य व खाद्यतेल जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी सोळंके साखर कारखाना, माजलगाव नगरपरिषद, गेवराई नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंब दाखल झाले होते. तर व्यापारी बांधवांनी देखील शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

संपादन - गणेश पिटेकर