esakal | क्रिकेटवर सट्टा, ११ जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Betting

क्रिकेटवर सट्टा, ११ जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अंबाजोगाई (जि.बीड) : क्रिकेट सामन्यात सट्टेबाजी करणाऱ्या येथील ११ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील तानाजी मालुसरे चौकात मंगळवारी (ता.२७) रोजी सायंकाळी आयपीएलवर सट्टेबाजी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांच्या पथकाने छापा मारून चार सट्टेबाजांना रंगेहाथ पकडले. अन्य सात जण फरार झाले. यावेळी पोलिसांनी पाऊण लाखांचा मुद्देमालही जप्त केला.

मंगळवारी सायंकाळी आयपीएल क्रिकेटचा सामना रंगला होता. मालुसरे चौकात या क्रिकेट सामन्यावर काही जण सट्टा खेळत होते. ही माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाय यांच्या पथकाने रात्री साडेआठच्या सुमारास येथे छापा टाकला. येथे ११ जण मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीद्वारे सट्टा खेळत आणि खेळवित असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच काही जणांनी पळ काढला. यावेळी पोलिसांनी गोपाळ, लक्ष्मीकांत, शुभम (सर्व रा.धायगुडे), संदीप गायकवाड यांना ताब्यात घेतले. मनोज कालिया, निलेश डिडवाणी, सुरेश सोमाणी, नयन काम, अभिषेक कदम, बबलु कातळे हे फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून पंचाहत्तर हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस अंमलदार श्री. कसबे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक श्री .गव्हाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. चोरगे, पोलिस अंमलदार श्री.आतकारे, श्री.खरटमोल, श्री.कागणे, श्री.घुगे, श्री.कसबे यांनी ही मोहिम पार पाडली .

loading image