आईला मारहाण केल्याने राग अनावर, मुलाने वडिलांवर झाडल्या गोळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Firing

भारतीय सैन्य दलातून एक मार्चला निवृत्त झालेल्या संतोष लटपटे यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता. त्यांनी पत्नीला मारहाण केली.

आईला मारहाण केल्याने राग अनावर, मुलाने वडिलांवर झाडल्या गोळ्या

आष्टी (जि.बीड) : आईला मारहाण केल्याने (Beed) राग अनावर झालेल्या मुलाने बापाच्या दिशेने बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी पोटाला लागल्याने वडील जखमी झाल्याची घटना (Ashti) येथील विनायकनगर भागात गुरुवारी (ता. २०) सायंकाळी घडली. पोलिसांनी संशयितास अटक केली असून जखमीची प्रकृती स्थिर आहे. संतोष किसन लटपटे (वय ५०) असे जखमीचे नाव आहे. किरण संतोष लटपटे (२४) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष लटपटे हे निवृत्त सैनिक असून त्यांचा मुलासोबत वाद झाला. यातून किरणने संतोष लटपटे यांच्या दिशेने बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी पोटात लागल्याने संतोष लटपटे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगर (Ahmednagar) येथे हलविण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयितास अटक केली. दारूच्या नशेत वडिलांनी आपल्यासमोर आईला बेदम मारहाण केली. त्यामुळे राग अनावर झाला, त्यातून वडिलांवर गोळ्या झाडल्याचे किरणने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. (Beed Crime News Son Was Shoot His Father In Ashti)

हेही वाचा: औरंगाबाद जिल्ह्यात पाच वर्षांत आठशेवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या

झटापटीत बंदूक पडली अन् ...

भारतीय सैन्य दलातून एक मार्चला निवृत्त झालेल्या संतोष लटपटे यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता. त्यांनी पत्नीला मारहाण केली. त्यामुळे मुलगा किरण लटपटे संतप्त झाला. दोघांत धरपकड झाली. यानंतर संतोष लटपटे यांनी मुलावर बंदूक रोखली. मात्र, झटापटीत बंदूक पडल्यानंतर किरणने ती घेऊन वडिलांवरच गोळ्या झाडल्या.

loading image
go to top