केज पंचायत समितीत एफटीओ घोटाळा?; मनरेगा अन् व्हीबीजी-रामजी योजनेत टक्केवारीचा खेळ

केज पंचायत समितीत एफटीओ घोटाळा?; मनरेगा अन् व्हीबीजी-रामजी योजनेत टक्केवारीचा खेळ
Published on: 
नियम डावलून मर्जीतील देयके काढल्याचा आरोप बीड, ता. ३ (बातमीदार) ः केज पंचायत समिती अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) तसेच व्हीबीजी-रामजी योजनेतील निधी वाटप आणि एफटीओ (फंड ट्रान्सफर ऑर्डर) प्रक्रियेत शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नियम व ज्येष्ठता यादी बाजूला ठेवून केवळ टक्केवारी देणाऱ्या मर्जीतील व्यक्तींची देयके प्राधान्याने अदा केल्याचा घणाघाती आरोप माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हीबीजी-रामजी या नवीन योजनेतून जुन्या रस्त्यांच्या कामांची देयके लाटण्यासाठी विनापरवाना जुन्या यादीतील एफटीओ रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवण्यात आली. तसेच, नव्याने मोजमापे तयार करून यात मोठी अनियमितता केल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ६ पानांची एफटीओ ज्येष्ठता यादी पुराव्यादाखल जोडून लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. शासनाचे कडक निर्देश असतानाही सन २०२०-२१ व २०२१-२२ मधील जुनी कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील मर्जीतील देयके नियमबाह्य पद्धतीने वर्ग करण्यात आली आहेत. या गंभीर प्रकरणाची बीड पंचायत समितीच्या धर्तीवर तातडीने स्वतंत्र उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ------ सदर प्रकरणाची चौकशी ही सर्व अभिलेख आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तक्रारदाराच्या समक्ष करण्यात यावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संशयास्पद एफटीओ तात्काळ गोठवण्यात यावेत आणि पुराव्यांशी कसलीही छेडछाड होऊ नये, यासाठी मूळ रेकॉर्ड सुरक्षित ठेवावे. - दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे, माजी पंचायत समिती सदस्य, केज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com