

Livestock owners in Beed district face a severe fodder shortage as cattle feed stocks decline.
बीड, : जिल्ह्यात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. प्रशासनाच्या केवळ नियोजन आणि मार्गदर्शनाच्या गप्पा सुरू असतानाच, चारा संकट थेट आठ ते अकरा दिवसांवर येऊन ठेपले आहे. जिल्ह्यातील ८ लाख ४२ हजार ३८० पशुधनासाठी सध्या अवघा ३५ हजार ८७६ मेट्रिक टन चारा शिल्लक असल्याने मुक्या जनावरांचा जीव टांगणीला लागला आहे. रब्बी चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करून दिलेला दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी नेमका कुठे आणि कशावर खर्च होत आहे? हा निधी केवळ बैठका आणि साक्षरता अभियानावरच खर्ची पडणार का, असा संतप्त सवाल पशुपालकांकडून उपस्थित केला जात आहे.