Beed Ganesh Visarjan: मिरवणुकीत नाचा ; पण डीजे अजिबात चालणार नाही;प्रशासनाचा इशारा ; चार विहिरींवर विसर्जनाची सोय, मार्गावर हायमास्टचा झगमगाट

Beed Prepares for Ganesh Visarjan Procession : बीडमध्ये गणेश विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त; एआय ड्रोनची नजर, ४ हजार पोलिसांचा खडा पहारा
Beed Ganesh Visarjan

Beed Ganesh Visarjan

esakal

Updated on: 

बीड, : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर आता लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ समीप आली आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलाल उधळत आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बीड शहर व संपूर्ण जिल्हा आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे नद्या आणि तलाव कोरडेठाक पडले आहेत, त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनाचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. मात्र, नगरपालिकेने वेळीच योग्य नियोजन करत शहरातील चार ऐतिहासिक विहिरींवर विसर्जनाची उत्तम सोय केली आहे. दुसरीकडे, या भक्तीमय वातावरणाला गालबोट लागू नये आणि विसर्जन मिरवणूक निर्विघ्न व शांततेत पार पडावी, यासाठी बीड पोलिस दलाने संपूर्ण शहराला एका अभेद्य छावणीचे स्वरूप दिले आहे. आकाशातून एआय ड्रोनची करडी नजर, रस्त्यांवर सीसीटीव्ही व्हॅन आणि चोहोबाजूंनी तब्बल ४ हजार पोलिसांचा खडा पहारा, अशा कडेकोट आणि सुरक्षित वातावरणात बीड जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com