
गेवराई : अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाल्याने गेवराई तालुक्यावर शोककळा पसरली. अंत्यसंस्काराप्रसंगी हुंदके आणि आक्रोश होता. अनेकांचे डोळे पाणावले होते. धुळे-सोलापूर महामार्गावरील गढी येथील उड्डाणपुलावर सोमवारी (ता. २६) रात्री ट्रकने या तरुणांना चिरडले होते.