बीडच्या आरोग्य यंत्रणेचे ‘मिशन सर्जरी’

बीडच्या आरोग्य यंत्रणेचे ‘मिशन सर्जरी’
Published on
पान तीन लीड -- बीडच्या आरोग्य यंत्रणेचे ‘मिशन सर्जरी’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; तालुक्यांना स्पेशालिस्ट मिळाल्याने सेवा होणार सुलभ सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १२ : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या ९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा (गट-अ) मधील अधिकाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार मूळ संवर्गात पदस्थापना देण्यात आली आहे. या व्यापक प्रशासकीय फेरबदलामुळे बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नवे आदेश जारी झाले आहेत. शासनाने दिलेल्या स्पष्ट निर्देशानुसार, बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याचे व रजा न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ​या प्रशासकीय निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टरांची बळकट फळी मिळाली आहे. ​यात डॉ. संजय सुभाष सोनटक्के (अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ) : बालरोग रुग्णालय नेकरनूर येथून सामान्य रुग्णालय, धारूर, ​डॉ. विजय मोहनराव लोंढे उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथून वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय नांदूरघाट, ​डॉ. बाळासाहेब शहाजीराव घोडके (बधिरीकरण शास्त्रज्ञ) स्त्री रुग्णालय नेकनूर येथे पदस्थापना, ​डॉ. प्रकाश मधुकरराव शिवणीकर (स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ) स्त्री रुग्णालय नेकनूर येथून वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय केज, ​डॉ. परवीन शेख (स्त्रीरोगतज्ज्ञ) जिल्हा रुग्णालय बीड येथून उपजिल्हा रुग्णालय केज, ​डॉ. पूनम लोध (स्त्रीरोगतज्ज्ञ) जिल्हा रुग्णालय बीड येथून ग्रामीण रुग्णालय नांदूरघाट, ​डॉ. स्नेहल मेंगडे (स्त्रीरोगतज्ज्ञ) ट्रॉमा केअर युनिट बीड येथून ग्रामीण रुग्णालय माजलगाव. दुसऱ्या बाजूला, जिल्हा रुग्णालयातील काही अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची इतर जिल्ह्यांत बदली झाली आहे, ​डॉ. सूर्यकांत सावंत (स्त्रीरोगतज्ज्ञ) जिल्हा रुग्णालय बीड ते स्त्री रुग्णालय गडचिरोली, ​डॉ. रामेश्वर आव्हाड (स्त्रीरोगतज्ज्ञ) ट्रॉमा केअर युनिट बीड ते उपजिल्हा रुग्णालय वसमत (हिंगोली), ​डॉ. जितेंद्र गोकुलप्रसाद जैस्वाल (बालरोगतज्ज्ञ) सामान्य रुग्णालय बीड ते वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय चाकूर (लातूर), ​डॉ. गुरुबस नागनाथ शेटे (बधिरीकरण शास्त्रज्ञ) लोखंडी सावरगाव ते वैद्यकीय अधीक्षक, तेर (धाराशिव), ​डॉ. दयानंद बाबूराव कवडे (क्ष-किरण तज्ज्ञ) बीड ते वैद्यकीय अधीक्षक वाशी (धाराशिव), ​डॉ. वेणुगोपाल ओंकारचंद्र पंडित (नाक-कान-घसा तज्ज्ञ) बीड ते वैद्यकीय अधीक्षक धर्माबाद (नांदेड) याची बदली करण्यात आली. तालुका स्तरावर प्रसूती तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ उपलब्ध झाल्याने गर्भार महिलांना तातडीने सिझरियन किंवा उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागणार नाही. यामुळे सर्वसामान्य आणि दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांचा मोठा आर्थिक खर्च वाचेल. चौकट तात्काळ रुजू व्हा, अन्यथा अनधिकृत अनुपस्थिती; शासनाचा कडक इशारा ​शासकीय आदेशानुसार बदली झालेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना नवीन नियुक्तीच्या जागी विहित मुदतीत हजर होणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कालावधीत कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही. मुदतीत हजर न राहिल्यास संबंधित अधिकाऱ्याची ''अनधिकृत अनुपस्थिती'' मानून सेवेत खंड पाडला जाईल, असा कडक इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. चौकट स्त्रीरोगतज्ज्ञांच्या बदल्यांमुळे सिव्हिलवरील ताण वाढणार ​बीड जिल्हा रुग्णालयातून डॉ. सूर्यकांत सावंत, डॉ. रामेश्वर आव्हाड, डॉ. परवीन शेख आणि डॉ. पूनम लोध यांसारख्या अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञांची एकाच वेळी इतरत्र बदली झाली आहे. जिल्हा रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्यातून दररोज शेकडो गर्भवती उपचारासाठी आणि प्रसूतीसाठी येतात. एकाच वेळी चार-चार तज्ज्ञ डॉक्टर कार्यमुक्त झाल्यामुळे उर्वरित वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडणार असून, ऐन मोक्याच्या वेळी रुग्णांचे हाल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com