Beed Jarud History
esakal
बीड : बीड परिसरावर शके ११९४ मध्ये महामंडलिक देवल्लदेवांचे राज्य होते. त्याचा मुख्य अधिकारी राजलदेव महाप्रधान नाईकदेव व प्रमुख नायक कायस्थ देवेश्वर देव (Bhairavnath Temple) या सर्वांनी तालुक्यातील जरूड येथील मंदिराला दान दिल्याचा महत्वपूर्ण पुरावा शिलालेख व इतिहास अभ्यासकांनी समोर आणला आहे. जरूड येथील शिलालेखाचे तज्ज्ञांनी वाचन केल्यानंतर ही बाब समोर आली.