esakal | अंबाजोगाईत ऑक्सिजन बंद राहिल्याने ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप

बोलून बातमी शोधा

अंबाजोगाईत ऑक्सिजन बंद राहिल्याने ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप
अंबाजोगाईत ऑक्सिजन बंद राहिल्याने ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अंबाजोगाई (जि.बीड) : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अर्धातास ऑक्सिजन बंद राहिल्याने ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी आज बुधवारी (ता.२१) केला आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी हे आरोप प्रसिद्ध पत्रक काढून फेटाळले आहेत. त्यात म्हटले आहे, की रुग्णालयात कोविडचे एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामधील बहुतांश रुग्णांचे वय ६० पेक्षा जास्त आहे.

काही रुग्णांचा मृत्यू हा भरती होताना ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. तसेच त्यांना दमा, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन इत्यादी शारीरिक व्याधी असल्याचे दिसून आलेले आहे. परंतु समाज माध्यमांमध्ये रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, अशा बातम्या येत आहे. पुढे अधिष्ठाता म्हणतात, रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणे कामी लोखंडी सावरगाव, बीड, लातूर औरंगाबाद, नांदेड व जालना या ठिकाणाहून जम्बो सिलेंडरचा व लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पाठपुरावा करण्यात येत आहे. सध्या रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध आहे.