

Beed Fuel Shortage
esakal
बीड: इराण-इस्राईल-अमेरिका युद्धाचे दृश्य परिणाम आता अधिकच गडद झाले आहेत. सुरवातीला व्यवसायिक गॅस सिलिंडरची टंचाई घरगुती सिलिंडरपर्यंत पोचली. आता तर पेट्रोल पंपांवरही इंधनाचा तुटवडा स्पष्टपणे दिसत आहे. रविवार (ता. २२) दुपार पासून सोमवारीही (ता. २३) प्रमुख पेट्रोल पंप इंधन नसल्याने बंद होते.
कंपन्यांकडून वितरकांना मिळणारे क्रेडिट (उधारीवर पेट्रोल - डिझेलचे टॅंकर) बंद झाले असून मागील दोन दिवस रमजान, रविवार सुट्यांमुळे वितरक बॅंकांतून कंपन्यांना पैसे पाठवू शकले नसल्याचा परिणाम रविवारी जिल्ह्यात दिसून आला.