A ration shop in Beed district, where beneficiaries have raised concerns over transparency and alleged extra charges.
esakal
नितीन चव्हाण
बीड, : जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असल्यानेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मनमानी आणि काळ्या कारभाराने कळस गाठला आहे. प्रत्येक रेशन दुकानात सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक केल्यास धान्य वाटपातील काळाबाजार, अवैध वसुली आणि गरिबांच्या हक्काच्या धान्यावर मारला जाणारा डल्ला एका झटक्यात थांबू शकतो. मात्र, कॅमेऱ्याची नजर नसल्याने आणि दुकानांबाहेर ना डिजिटल बॅनर, ना स्पष्ट फलक अशी अवस्था असल्याने संपूर्ण रेशन व्यवस्थेत पारदर्शकतेची ऐशीतैशी झाली आहे. त्यातच काही दुकानदार वाहतूक खर्च आणि हमालीच्या नावाखाली प्रतिव्यक्ती चक्क दहा रुपये उकळत असल्याचा धक्कादायक आरोप समोर आल्याने रेशन दुकाने आता अविश्वास आणि तक्रारींच्या भोवऱ्यात सापडली आहेत.