Beed Crime : बीडमध्ये चाललंय काय? दारू सुटावी म्हणून व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले अन् सकाळी झाला मृत्यू; अंगावर मारहाणीचे वळ

Sainath Kadam Death at Beed De-Addiction Center Raises Suspicion : बीड येथील व्यसनमुक्ती केंद्रात साईनाथ जगन्नाथ कदम या तरुणाचा मृत्यू झाला. मृतदेहावर वळ आढळल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
Beed Crime News
Updated on

बीड : तरुणाला जडलेले दारूचे व्यसन सुटावे यासाठी कुटुंबीयांनी त्याला बुधवारी (ता. २९) रात्री उशिरा शहरातील आधार व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. गुरुवारी (ता. ३०) सकाळी या केंद्रातून फोन आला आणि तुमच्या मुलाला दुखत असल्याचे सांगण्यात आले. कुटुंबीयांनी धाव घेतली तेव्हा तरुणाचा मृत्यू (Beed Crime News) झाल्याचे समोर आले. त्याचा चेहरा, पाठीवर मारहाणीचे वळ पाहून घातपाताचा संशय व्यक्त करत नातेवाईक आक्रमक झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com