आपला दसरा, आपली परंपरा;

आपला दसरा, आपली परंपरा;
Published on: 
भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग बीड, ता. १५ : जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तिगडावर मंगळवारी (ता. २०) पारंपरिक दसरा मेळावा होणार आहे. ‘आपली परंपरा आणि आपला दसरा साजरा करण्यासाठी मी स्वतः गडावर येत आहे. आपणही कुटुंबासह या, सुखरूप पोचा आणि कार्यक्रमानंतर सुखरूप घरी परता’, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. भगवान भक्तिगडावरील दसरा मेळावा हा वंचित, शोषित आणि सर्वसामान्यांचा महामेळावा म्हणून ओळखला जातो. पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भगवान बाबांच्या जन्मभूमीत हा सोहळा पार पडणार आहे. या पवित्र भूमीवरील ज्ञानेश्वरी वाचन करणारी भव्य मूर्ती आणि तळघरातील मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक आणि मुंडे समर्थक उपस्थित राहतात. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी प्रशासनाने अधिकृत परवानगी दिली आहे. पाटोद्याचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी मंजुरीचे पत्र जारी केले आहे. आयोजकांनी सहा ऑक्टोबरला सादर केलेल्या अर्जानुसार ही परवानगी देण्यात आली. भगवान भक्तीगडावरील १० एकर १० गुंठे क्षेत्रावर मेळावा होणार आहे. परवानगी मिळाल्याने तयारीला वेग आला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com