sambhaji nagar
sambhaji nagar sakal

Sambhaji Nagar News : खैरेंना दानवे घाबरणारे नाहीत

भागवत कराड : भाजपच्या संस्कारांमुळेच दानवेंना यश

‘विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर भाजपचे संस्कार आहेत. यामुळेच ते यशस्वी झालेत. ते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना घाबरणारे नाहीत. शेवटी दानवे यांना लोकसभेची उमेदवारी द्यायची का? हे महाविकास आघाडी ठरवेल’’, असे वक्तव्य केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी (ता. २६) माध्यमांशी बोलताना केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा ऐकायला मिळाल्या.

लोकसभा निवडणुकीला वेळ असला तरी त्यापूर्वीच राजकीय फटाके फुटत आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण ? खैरे की दानवे यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत मंत्री कराड यांना विचारले असता, ‘‘हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आमचे काम करत आहोत, त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. दानवे यांना लोकसभेची उमेदवारी द्यायची का? हे मविआ ठरवेल. परंतु, दानवे हे भाजपमध्ये तयार झालेले चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर भाजपचे संस्कार आहेत.

लोकसभा निवडणुकीला वेळ असला तरी त्यापूर्वीच राजकीय फटाके फुटत आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण ? खैरे की दानवे यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत मंत्री कराड यांना विचारले असता, ‘‘हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आमचे काम करत आहोत, त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. दानवे यांना लोकसभेची उमेदवारी द्यायची का? हे मविआ ठरवेल. परंतु, दानवे हे भाजपमध्ये तयार झालेले चांगले कार्यकर्ते आहेत.

त्यांच्यावर भाजपचे संस्कार आहेत. या संस्कारामुळेच ते यशस्वी ठरले आहेत’’, असा दावाही त्यांनी केला. एकीकडे ठाकरे गट आणि भाजपमधील राजकीय संघर्ष वाढत आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करायची एकही संधी सोडत नाही. अशी परिस्थिती असताना एकप्रकारे त्यांनी दानवे यांचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात दिवसभर उलट सुलट चर्चा ऐकायला मिळाली. दरम्यान, महायुतीपुढे महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे हे संभाव्य उमेदवार असू शकतात. त्यामुळे महाविकास आघडीच्या नेत्यांमध्ये फूट पाडण्याच्या हेतूने कराड यांनी हे वक्तव्य केले असू शकते, अशी चर्चा आहे.

..पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल

लोकसभेचा छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ शिंदे गट लढवेल की भाजप, येथे उमेदवार नेमका कोण असेल? याबाबत डाॅ. कराड यांना विचारले असता, त्यांनी एनडीएचा खासदार होईल, असे सांगत, बाकी पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, असेही नमूद केले.

यावर मी काय बोलणार?

अंबादास दानवे (विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते) : मी त्यांच्या वक्तव्यावर काहीही बोलणार नाही. अशा वक्तव्यावर काही प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही.

दानवेंना घडविण्यात माझा सहभाग मोठा

चंद्रकांत खैरे (शिवसेना नेते) : अंबादास दानवे यांनी भाजपमध्ये काम केलेले असले तरी ते शिवसेनेत घडले आहेत. त्यांना शिवसेनेनेच मोठे केले आहे. त्यात माझा सहभाग जास्तीचा आहे. आता डॉ. कराडांना अंबादास दानवे बोलणारही नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com