Dr. Bhagwat Karad provided emergency medical assistance to a woman passenger during an IndiGo flight to Aizawl.
esakal
छत्रपती संभाजीनगर, : दिल्लीहून ऐजवालकडे जाणाऱ्या ‘इंडिगो’च्या विमानात एका महिला प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडल्यानंतर, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा बालरोग शल्यचिकित्सक डॉ. भागवत कराड यांनी तातडीने वैद्यकीय मदत करत तिचे प्राण वाचवले. डॉ. कराड सकाळी ८.३० च्या फ्लाइटने शनिवारी (ता. तीन) मिझोरमकडे जात होते. सकाळी १०.२० च्या सुमारास विमानातील एका ३५ वर्षीय किडनी विकारग्रस्त महिला प्रवाशाला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. त्यांची ऑक्सिजन पातळी अवघ्या ३४ टक्क्यांपर्यंत घसरली होती.