पान ४ साठी

पान ४ साठी
Published on: 
फोटो भक्ती पवारला तलवारबाजीत रौप्य पदक अंबाजोगाई ः येथील श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळ योगेश्वरी कन्या विद्यालयाच्या भक्ती भाऊसाहेब पवार हिने जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. यामुळे तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत अंबाजोगाई येथे रविवारी (ता. ४) जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भक्ती पवारने उत्कृष्ट खेळ करत हे रौप्य पदक पटकावले. तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिच्या प्रशिक्षकांसह विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांनी तिचे विशेष कौतुक केले आहे. ----- जिल्हाधिकाऱ्यांची नेकनूरच्या कुटीर रुग्णालयाला भेट नेकनूर ः बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नेकनूर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयास भेट देऊन रुग्णसेवेची पाहणी केली. त्यांनी रुग्णांशी संवाद साधून समाधान व्यक्त केले, तसेच नूतन इमारतीच्या बांधकामाचा आढावाही घेतला. सार्वजनिक बांधकाम व सिताई कन्स्ट्रक्शनच्या अभियंत्यांना प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रुग्णालयासाठी डीपीडीसीतून निधी आणि एक्सप्रेस फिडरसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळुंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक हुबेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष शहाणे, डॉ. मुख्तार शेख, उपसरपंच सचीन शिंदे, ग्रा.प. सदस्य शिवाजी शिंदे, सय्यद रिझवान, लालू जहागीरदार, बांधकामचे अभियंता पराजणे, सिताईचे अभियंता येओले आदींसह प्रतिष्ठित नागरिक आणि कर्मचारी उपस्थित होते. ----- चौसाळा शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी विष्णू कळासे चौसाळा ः येथील जि. प. माध्यमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी विष्णू त्रिंबक कळासे, तर उपाध्यक्षपदी इरफान इस्माईल बागवान यांची निवड झाली. पुरुष सदस्य म्हणून शेख जाकेर युसुफ, जाधव गंगाधर, कळासे सुरज, भंडारे सतीश, जोगदंड विक्रांत, गिरी अंबऋषी, तावरे विष्णू, नाईकवाडे अजिनाथ आणि महिला सदस्य म्हणून वायभट स्वाती, जोगदंड उषा, पवार अनुजा, चौधरे अश्विनी, काटवटे अश्विनी, जोगदंड सारिका, नाईक अनुसया, गुंजाळ रेवती, शिंदे सुनंदा व कुरेशी सुमेरा इर्शाद यांची निवड झाली. निवडणूक प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका पद्मजा हंपे होत्या. त्यांना ज्येष्ठ शिक्षक सुभाष काकड व महारुद्र झोडगे यांची साथ लाभली. सर्व निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले. ----- ‘नासा व इस्रो परीक्षा सरावसंच’ आवृत्तीचे प्रकाशन माजलगाव ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व अवकाश संशोधनाची जिज्ञासा निर्माण करण्यासाठी आणि नासा-इस्रो शैक्षणिक सहल निवड चाचणी परीक्षेची तयारी प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरणारे शिक्षक डॉ. राजकुमार राठोड लिखित ‘बीड जिल्हा परिषद नासा व इस्रो शैक्षणिक सहल निवड चाचणी परीक्षा घटकनिहाय सरावसंच’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, उपशिक्षणाधिकारी अंजुम सय्यद, श्री. जाधव, गटशिक्षणाधिकारी कल्पेश दळवी, प्रतिभा भराडे, केंद्रप्रमुख सुभाष सारूक, लेखक डॉ. राजकुमार राठोड उपस्थित होते. या साहित्यातून विद्यार्थ्यांची विज्ञानाची जिज्ञासा वाढेल, असे जितीन रहेमान म्हणाले. सूत्रसंचालन सोमनाथ वाळके यांनी केले; तर अंजुम सय्यद यांनी आभार मानले. ----- फोटो ः ‘गुणवत्ता हेच नवविकास मंडळाचे यश’ माजलगावः श्रीमंतांची मुले शिकवणे सोपे असते, पण कष्टकरी कुटुंबातील लेकरांत गुणवत्ता निर्माण करणे हेच नवविकास मंडळाचे खरे यश आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षक आमदार डी. के. देशमुख यांनी केले. येथील नवविकास मंडळाच्या गुणवंत विद्यार्थी आणि नूतन कार्यकारिणी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी एस. आर. शर्मा, प्रा. पी. के. देशमुख, शिरीष देशमुख, सुहास देशमुख, डॉ. सचिन देशमुख, गणेश मूळाटे, अभिमन्यु इबिते उपस्थित होते. दहावीत उत्कृष्ट गुण मिळवणारे विद्यार्थी, तसेच स्नेहा साळवे, विद्या सोळंके व इतर यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक अभिमन्यु इबिते, सूत्रसंचालन हिमांशू देशमुख, तर आभार मोरेश्वर मसलेकर यांनी मानले. मुख्याध्यापिका संजीवनी कांबळे, अंजली शिंदे, पर्यवेक्षक सुधीर देशमुख, किशोर मोताळे यांनी परिश्रम घेतले. ------ मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी खेडकर शिरूर कासार ः मराठी पत्रकार परिषदेच्या शिरूर कासार तालुका शाखेच्या अध्यक्षपदी गोरख खेडकर, उपाध्यक्षपदी जगन्नाथ परजणे, सचिवपदी नवनाथ सानप, तर सहसचिवपदी प्रतीक भांडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व राज्याध्यक्ष शिवराज काटकर यांच्या आदेशानुसार, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत राजहंस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही निवड झाली. या निवडीची घोषणा जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी केली. या निवडीबद्दल छत्रपती संभाजीनगर विभागाचे सचिव रवी उबाळे, विभागीय समन्वयक सुभाष चौरे, राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे, जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत, चंद्रकांत राजहंस आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ----- विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांवर कारवाई अंमळनेर ः पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशाचे उल्लंघन करून नवरात्रोत्सवातील मिरवणुकीत विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांवर अंमळनेर पोलिसांनी कारवाई करत डीजे व वाहने जप्त केली आहेत. खोपटीचे राजेंद्र पांडुरंग वारे, भीमराव वारे, अतुल वारे व कारेगावचे गणेश सुदाम जेधे, एकनाथ दहिफळे, दत्तू कांबळे, गणेश जाधव, अर्जुन जाधव यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मिरवणुकीत कारवाई करताना संबंधितांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणला. सपोनि सतीश कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब शिंदे, योगेश बहिरवाल, श्याम खाडे, संदीप सांगळे, दिलीप घोशीर व हनुमंत बांगर यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोउनि कृष्णा चव्हाण, पोउनि सतीश भवर, सफौ बबन शिंदे, पोहेकॉ हनुमंत बांगर व पोकॉ योगेश बहिरवाल करत आहेत. ----- फोटो ः आई-वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी कृतज्ञतेचे हृदय लागते : समाधान महाराज बीड ः सलग २० वर्षे आईच्या स्मृती अखंडपणे जपण्यासाठी संस्कार आणि कृतज्ञतेचे हृदय लागते, असे प्रतिपादन शिवकथाकार समाधान महाराज शर्मा यांनी केले. माजी खासदार स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या २० व्या पुण्यस्मरणानिमित्त काकू-नाना प्रतिष्ठानतर्फे आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. क्षीरसागर कुटुंबाने काकूंच्या विचारांचा वारसा जोपासला असून, काकूंनी सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळवले होते, असेही ते म्हणाले. ----- राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा शनिवारी अंबाजोगाई ः येथील योगेश्वरी शिक्षण संस्था, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय व योगेश्वरी प्रबोधिनीच्या वतीने वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य भ. कि. सबनीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी (ता. १७) राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्ता, विकास विरुद्ध पर्यावरण, फेक न्यूज अशा विविध विषयांवर सादरीकरण होईल. विजेत्यांना सांघिक व वैयक्तिक गटांत रोख पारितोषिके दिली जातील. स्पर्धेचे उद्घाटन लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव बी. बी. ठोंबरे व माजी विद्यार्थी भारत गोचडे यांच्या उपस्थितीत होईल. अध्यक्षस्थानी चंद्रशेखर बर्दापूरकर, तर बक्षीस वितरणाचे अध्यक्ष पी. एस. कुलकर्णी असतील. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख, उपप्राचार्य रमेश सोनटक्के, जितेंद्र देशपांडे व प्रा. रमेश सोनवळकर यांनी केले आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com