जातीपलीकडे जाऊन समतेसाठी क्रांतीची गरज ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांचे प्रतिपादन;

जातीपलीकडे जाऊन समतेसाठी क्रांतीची गरज   ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांचे प्रतिपादन;
Published on: 
LTR26B15626 लातूर : ज्ञानप्रकाश ग्रंथालयातर्फे भारत सातपुते यांचा सत्कार करताना ज्ञानेश्वर बंडगर महाराज, प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, माधव बावगे, फ.म. शहाजिंदे आदी. -- ‘जातीपलीकडे जाऊन समतेसाठी क्रांतीची गरज’ ------ लातूर, ता. १४ : जातीपातीच्या पलीकडे जाऊन समतेसाठी क्रांती होण्याची गरज आहे. पूजाअर्चा, मंत्र-तंत्र व मूर्ती पूजेमुळे संतांच्या वैचारिकतेकडे दुर्लक्ष होत आहे. सामाजिक परिवर्तनाची नांदी खऱ्या अर्थाने पंढरीत सुरवात झाली असली, तरी ही पताका घरोघर पोचविण्याचे कार्य कीर्तन प्रवचनकारांकडून होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सांगोला येथील संत साहित्याचे अभ्यासक व कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांनी केले. लेखक भारत सातपुते यांनी यांनी ६५ अधिक पुस्तकांची निर्मिती केली असून, त्यांना १०० हून पुरस्कार मिळाले आहेत. यानिमित्ताने प्रकाशनगर येथे ज्ञानप्रकाश ग्रंथालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी इतिहासतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष माधव बावगे, ज्येष्ठ साहित्यिक फ.म. शहाजिंदे, ग्रंथपाल मंगल बावगे, सतीश नरहरे, यू.के. गायकवाड, विवेक बावगे, माधुरी बावगे आदी उपस्थित होते. बंडगर महाराज म्हणाले, कधी विनोदाने तर कधी गांभीर्याने सातपुते यांच्या साहित्यात परिवर्तनाची ओढ दिसते. ती वाखाणण्याजोगी आहे. डॉ. रोडे म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून सातपुते यांच्या साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक कार्याचे आम्ही साक्षीदार असून त्यांच्या वक्तृत्वाने व कवितेने रसिकांच्या मनात घर केले आहे. स्पष्टवक्तेपणा त्यांनी कधी सोडला नाही. आपल्या लेखणीशी ते नेहमीच प्रामाणिक राहिले. माधव बावगे, रुक्साना मुल्ला यांनी प्रास्ताविक, तर अब्दुल गालिब शेख यांनी सूत्रसंचालन केले. कवी शंकर झुल्फे यांनी आभार मानले.