दहा लाखाचा गांजा जप्त

दहा लाखाचा गांजा जप्त
Published on: 
भोरखेडा शिवारात गांजाची लागवड दहा लाखांची २० झाडे जप्त; एकावर गुन्हा दाखल ----- जाफराबाद, ता. २९ (बातमीदार) : तालुक्यातील भोरखेडा शिवारातील गट क्रमांक ४४ मधील शेतात गांजाची लागवड करून त्याची जोपासना केल्याप्रकरणी मंगेश रावसाहेब कोरडे यांच्याविरुद्ध जाफराबाद पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २८) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत पोलिसांनी २० किलो ८७ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली असून, त्यांची अंदाजे किंमत १० लाख ४३ हजार ५०० रुपये आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि जाफराबाद पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी रात्री भोरखेडा शिवारात छापा टाकला. मंगेश कोरडे यांच्या शेतात गांजाची लागवड करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गट क्रमांक ४४ मधील शेताची पाहणी केली असता तेथे गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचांसमक्ष ही झाडे मुळासकट उपटून त्यांचे वजन केले. त्यात झाडांचे एकूण वजन २० किलो ८७ ग्रॅम भरले. तपासासाठी सर्व झाडे जप्त करण्यात आली असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, जाफराबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश जाधव आणि त्यांच्या पथकाने केली. कारवाईत राजेंद्र वाघ, योगेश पवार, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, रुस्तुम जेवळ, दीपक घुगे, अक्रोड दांडगे, बाबा गायकवाड, सचिन राऊत, सुनील पवार तसेच पोलिस अंमलदार अरुण वाघ, अनिल डुरे, नीलेश दंडाईत, अनिल जोशी आणि प्रवीण खराडे सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com