Bidkin Protest : बिडकीन-चितेगाव रस्ता रुंदीकरणाविरोधात तीव्र रास्ता रोको आंदोलन, व्यावसायिक व ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा

Bidkin-Chitegaon Road Issue : बिडकीन ते निलजगाव १०० फुटी रस्ता रुंदीकरणाच्या निर्णयाविरोधात नागरिकांनी रास्ता रोको करत प्रशासनावर दबाव आणला; मार्किंग प्रक्रिया तात्पुरती थांबवण्याची घोषणा.
Bidkin Protest
Bidkin Protest Sakal
Updated on

रविंद्र गायकवाड

बिडकीन : बिडकीन ते चितेगाव तसेच निलजगाव रस्त्याच्या नियोजित १०० फुटी रुंदीकरणाच्या निर्णयाविरोधात आज सकाळी १० वाजता निलजगाव फाटा, बिडकीन येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून एकजूट दाखवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com