
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, महाविद्यालये आणि संशोधन केंद्रासह संलग्नित महाविद्यालयांत ता. एक जानेवारीपासून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी.साठी प्रवेशित परदेशी विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी आणि उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.