चौकाला बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची मागणी
धाराशिव, ता. १५ : भगवान बिरसा मुंडा यांचे क्रांतिकारी विचार, कार्य आणि समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान अतुलनीय असून, त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. शहरातील एका चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यासाठी नगर परिषदेने आगामी सर्वसाधारण सभेत ठराव घ्यावा, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. तसेच शहरात भव्य पुतळा उभारण्यासाठी सर्वांनी वैयक्तिक स्तरावर आर्थिक योगदान द्यावे, असेही ते म्हणाले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी (ता. १५) बिरसा मुंडा जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, नगराध्यक्ष नेहा काकडे, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, महिला व बालविकास सभापती वैशाली सोनवणे, नगरसेविका वंदना पवार यांची उपस्थिती होती.
-----
आदिवासी संस्कृतीच्या गजरात जयंती
बालकांपासून युवक-युवती, महिला आणि पुरुषांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषेत लक्षवेधी नृत्ये व लेझीम सादर केली. ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सोहळा दिमाखात पार पडला.
-----
धाराशिव : भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पारंपरिक नृत्य सादर करताना तरुणी.
OSM26B07397