
सचिन पवार
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडावे लागलेल्या भाजपने आता त्या जिल्ह्यांवर आपली नजर आणि पकड राहावी म्हणून १७ जिल्ह्यांमध्ये जिल्हा संपर्कमंत्री नेमले आहेत. पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी असे गोंडस कारण भाजपने दिले असले तरी त्यात भाजपचा ‘शत प्रतिशत’ निर्धार अधिक आहे.