उदगीर शहरामध्ये भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यास लुटले

चाकू दाखवत चेन पळवली, तिघांवर गुन्हा
लुटले
लुटलेsakal
Updated on

उदगीर : भारतीय जनता पक्षाचे येथील माजी तालुकाध्यक्ष वसंत शिरसे यांना दोघांनी मारहाण करून, गळ्याला चाकू लावून दीड तोळे सोन्याची चेन हिकसावल्याची घटना शुक्रवारी (ता.२) रात्री आठच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत युवराज शिरसे हे शुक्रवारी महादेव मंदिरातील जय हिंद बाल गणेश मंडळाच्या आरतीसाठी गेले होते. त्यावेळी सूरज सूर्यवंशी तेथे आला व त्याने शिरसे यांना बाजूला बोलावून घेतले. तेथे दोन तरुण थांबलेले होते. ‘तू माझ्याकडे काय म्हणून पाहतोस’ असे म्हणत सूरज सूर्यवंशी याने त्यांना मारहाण सुरू केली. दोघांची झटापट सुरू असताना अन्य दोघांपैकी एकाने शिरसे यांच्या गळ्याला चाकू लावला. त्यांची ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेतली व पसार झाला. अशा आशयाची फिर्याद शिरसे यांनी दिली. उदगीर शहर पोलिस ठाण्यात सूरज सूर्यवंशी व इतर दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक व्यंकट येडके तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership
Chhatrapati Sambhajinagar Traffic Issue
woman farmer success story
Nashik Ahilyanagar Akkalkot Surat Chennai highway land acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com