
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात २,५५५ नागरिकांना उशिरा जन्म प्रमाणपत्र दिले. त्यातील १ हजार बनावट आहेत. याप्रकरणी एसडीएम प्रमुख आरोपी असून, त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात एका अर्जाद्वारे केली. शनिवारी (ता. २९) सायंकाळी सोमय्या पोलिस ठाण्यात आले होते.