

Kannad taluka elections
sakal
बर्दापूर : अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे २१ जानेवारी रोजी पहाटे दोनच्या सुमारास बेकायदेशीर पिस्तूलमधून गोळीबार करणाऱ्या सय्यद अहमदअली मुब्बशीरअली हाशमी या ३५ वर्षीय तरुणाला बर्दापूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने विनापरवाना घातक शस्त्रे बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गोळीबार केल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. पोलीस हवालदार गणेश विक्रम तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.