
छत्रपती संभाजीनगर : मुंबईत गुरुवारी फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाल्याने जिल्ह्यातील शिवसेना व भाजपचे मंत्रिपदाचे दावेदार आमदार देव पाण्यात ठेवून बसले आहेत. शिवसेनेकडून संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार, तर भाजपकडून अतुल सावे, प्रशांत बंब व अनुराधा चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.