Smart Meter Protest: आधी समस्या सोडवा; मग स्मार्ट मीटर बसवा, भाजपची महावितरणकडे निवेदनाद्वारे मागणी
Power Supply: बजाजनगर परिसरात महावितरणकडून नोटीस न देता स्मार्ट मीटर बसवण्याचा काम सुरू असताना नागरिकांचे तक्रारी वाढल्या आहेत. भाजपने विजेच्या समस्या आधी सोडवण्याची मागणी करत निवेदन दिले आहे.
बजाजनगर : महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने वाळूज महानगरसह बजाजनगर परिसरात वीज ग्राहकांना कुठलीही सूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले आहे. या कामाला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे.