Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांची कोंडी भाजपच्या पथ्यावर! हॉटेल व्हिट्स खरेदी विधिमंडळात गाजली; स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण
Maharashtra Politics: हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरणामुळे संजय शिरसाट अडचणीत आले असून, त्यांच्याभोवती भाजप व मित्र पक्षांनी राजकीय दबाव वाढवला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अंतर्गत संघर्षाला उधाण आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरणावरून अडचणीत सापडलेल्या संजय शिरसाट यांचा बचाव करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी तीन वाक्यांत उत्तर देत उच्चस्तरीय चौकशीची घोषणा विधिमंडळात केल्याने स्थानिक पातळीवर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.