esakal | औरंगाबादेत भाजपतर्फे 12 ऑक्टोबरला ओबीसींचा विभागीय मेळावा | Aurangabad Political News
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप
औरंगाबादेत भाजपतर्फे १२ ऑक्टोबरला ओबीसींचा विभागीय मेळावा

औरंगाबादेत भाजपतर्फे १२ ऑक्टोबरला ओबीसींचा विभागीय मेळावा

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : ओबीसी आरक्षणावरून (Obc Reservation) चालढकलपणा करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत ओबीसी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यातून ओबीसी आरक्षणात सरकार कसे अपयशी ठरले यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. मेळाव्यास माजी मंत्री संजय कुटे, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार अतुल सावे, ओबीसी मोर्चाचे भगवान घडामोडे यांनी रविवारी (ता.10) पत्रकार परिषदेत दिली. शहानुरमियाँ दर्गा परिसरातील श्रीहरी पॅव्हेलियन येथे सकाळी अकरा वाजता हा मेळावा (BJP) घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास मराठवाड्यातून ओबीसी समाजाचे पदाधिकारी समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात आरक्षण (Aurangabad) वाचवण्यात राज्य सरकार कशाप्रकारे अपयशी ठरले. याच्यावर चर्चा करण्यात येणार आहे. यासह सर्व पातळ्यांवर सरकार कशाप्रकारे अपयशी ठरत आहे याचीही चर्चा केली जाणार आहे.

राज्य सरकारने एम्पिरिकल डाटा सादर केला नाही. यासह भाजप ओबीसी मोर्चाविषयी आवाज उठवल्यानंतर आयोग स्थापन केला. मात्र आयोगाला आता सरकार कामच करू देत नाही, असा आरोपही ओबीसीचे नेते भगवान घडामोडे यांनी सांगितले. राज्य सरकारमधील ओबीसी समाजाच्या मंत्र्यांनी निर्णय घेण्याची क्षमता असतानाही ते मेळावे तसेच रस्त्यावर उतरण्याची भाषा करू लागले आहे. त्यांच्या क्षमता आहेत. त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयी निर्णय घेण्याची गरज असताना ते अशी भाषा करीत ओबीसी समाजाला खेळवत ठेवण्याचं काम हे लोक करत असल्याचा आरोपही घडामोडे यांनी केला. म्हणून ओबीसी समाजाला आम्ही जागृत करण्यासाठी आम्ही एक मोहीम यात्रा हाती घेतली आहे. याची सुरुवात पंढरपूर येथून सुरुवात झाली आहेत. उद्या नाशिक येथे आहे तर 12 ऑक्टोबरला औरंगाबाद येथील यात्रा येणार आहेत. या मेळाव्यातून ओबीसींचे खरे मित्र कोण आणि शत्रू कोण हे यातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही पत्रकार परिषदेत भगवान घडामोडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस भगवान घडामोडे, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, शालिनी बुंधे, प्रा.गोविंद केंद्रे, राजेश मेहता, प्रा. राम बुधवंत उपस्थित होते

loading image
go to top