सातोना येथे १४० जणांचे रक्तदान
परतूर,ता.१२ (बातमीदार) : सातोना (खु.) येथे स्व. महेशभाऊ सीतारामजी आकात यांच्या जयंतीनिमित्त महेशभाऊ आकात फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या पाचव्या वर्षी १४० दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.यावेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, अशोकराव उबाळे, बदरभाई चाऊस, वैजनाथराव बागल, यश ग्रुपचे अध्यक्ष बालासाहेब आकात, बालासाहेब बिडवे, आसारामजी लाटे, परमेश्वर नाना आकात, डॉ. संजय लाटे, सिद्धार्थ बंड, नगरसेवक अंकुशराव तेलगड, भारतराव खंदारे आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, यश अर्बनचे कर्मचारी तसेच यश ग्रुपच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
.............
कोट
स्व. महेशभाऊ आकात यांनी समाजसेवेचा दिलेला विचार पुढे नेणे हीच आमची जबाबदारी आहे. रक्तदान हे केवळ एक सामाजिक उपक्रम नसून गरजू रुग्णाचे प्राण वाचविण्याचे माध्यम आहे. दरवर्षी रक्तदात्यांचा वाढता प्रतिसाद आम्हाला अधिक सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा देतो.
-बालासाहेब आकात, अध्यक्ष यश ग्रुप,सातोना