पाणी आताच मिळणार

पाणी आताच मिळणार
Published on: 
बोगद्याचे उर्वरित काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होणार : ॲड. भोसले धाराशिव, ता. १५ (बातमीदार) : जिल्ह्यासाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम निर्णायक टप्प्यावर पोचले आहे. सर्व आवश्यक कामे पूर्ण झाल्याने धाराशिवला सध्या एक टीएमसी पाणी मिळणार असून, बोगद्याचे उर्वरित दहा टक्के कामही प्रत्यक्ष सुरू होत आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचा दावा भाजपचे जिल्हा प्रवक्ते ॲड. नितीन भोसले यांनी केला आहे. दरम्यान, प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असल्याचे लक्षात येताच विरोधकांना जाग आली असून, श्रेय घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाल्याची टीकाही त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. ॲड. भोसले यांनी पत्रकात म्हटले, वर्षानुवर्षे तांत्रिक, कायदेशीर आणि आर्थिक अडथळ्यांमध्ये अडकलेल्या या प्रकल्पाला महायुती सरकारने गती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून प्रकल्पाला ११ हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. तसेच चार हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यामुळे रखडलेल्या कामाला गती मिळाली. आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनीही प्रकल्पासाठी पाठपुरावा केला. तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सुधारित प्रशासकीय मान्यता, निधीची तरतूद आणि काम पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम निश्चित करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे भोसले यांनी नमूद केले. प्रकल्प निर्णायक टप्प्यावर पोहोचताच काहींना आठवण झाली. आतापर्यंत प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी नेमका कोणता पाठपुरावा केला, कोणती प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आणि किती निधी उपलब्ध करून दिला, याचा हिशेब विरोधकांनी जनतेसमोर मांडावा, असे आव्हानही त्यांनी दिले. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी धाराशिवसाठी एक टीएमसी पिण्याच्या पाण्याला मंजुरी दिली आहे. पुढील आवर्तनात हे पाणी घाटणे बॅरेजमार्गे रामदरा तलावात आणण्याचे नियोजन आहे. योजना क्रमांक दोनच्या पाचही टप्प्यांचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याने पाणी आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. बोगदा प्रकल्प पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर असतानाच पाणी आणण्याच्या दृष्टीनेही ठोस कार्यवाही सुरू असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.