११७ ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंता’ अर्जांची होणार कागदपत्र तपासणी

११७ ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंता’ अर्जांची होणार कागदपत्र तपासणी
Published on: 
(((लीड))) -------- गृहनिर्माण अभियंत्यांच्या अर्जांची होणार छाननी ---- तीन पथके ११७ अर्जदारांच्या मूळ कागदपत्रे तपासणार ---- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. ३ : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कथित बोगस ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पदासाठी प्राप्त अर्जांची पात्रता तपासणी सुरू केली आहे. ११७ अर्जदारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बाह्य यंत्रणेद्वारे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांची नियुक्ती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ११७ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जदारांकडे शासनाने निश्चित केलेली शैक्षणिक व अन्य पात्रता आहे की नाही, याची खातरजमा करण्यात येणार आहे. पथक क्रमांक एकाकडे अर्ज क्रमांक १ ते ३९, पथक क्रमांक दोनकडे ४० ते ७९, तर पथक क्रमांक तीनकडे ८० ते ११७ अर्जांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पथक प्रमुखांसोबत सहायक अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. अर्जदारांच्या मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी करून शासन निर्णयानुसार पात्रता तपासली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कथित बोगस घरकूल अभियंत्याबाबत प्राप्त तक्रारीवर नियमोचित कारवाई करून तक्रारदारास कळविण्याचे व अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय स्तरावरून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कागदपत्र तपासणी महत्त्वाची मानली जात आहे. ---- आमदार राठोडही आक्रमक मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी तालुक्यात कार्यरत असलेल्या १५ ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या बदल्या करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. या मागणीवर प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. --- कंत्राटी कर्मचाऱ्यावरही आरोप जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी अनिल कागदेवाड हे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणसाठी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे जमा करीत असल्याचा आरोप काही तक्रारदारांनी केला आहे. या आरोपांबाबत प्रशासनाची भूमिका आणि तपासणीत त्याबाबत काही तथ्य आढळते का, याकडेही लक्ष लागले आहे. ------- यांच्याकडे तपासणीची जबाबदारी - पथक १ : अर्ज क्रमांक १ ते ३९ – विजय वाघमारे, प्रमुख - पथक २ : अर्ज क्रमांक ४० ते ७९ – रवीन रेड्डी, प्रमुख - पथक ३ : अर्ज क्रमांक ८० ते ११७ – राजेश तावडे, प्रमुख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com