२५ ऑक्टोबरला राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर मेळावा

२५ ऑक्टोबरला राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर मेळावा
Published on
संभाजीनगरमध्ये २५ ऑक्टोबरला राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर मेळावा छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे २५ ऑक्टोबरला राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर मेळावा होणार आहे, अशी माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक आणि महिला जिल्हाध्यक्ष सुचेता पालोदकर यांनी दिली. समर्थनगर येथील श्री समर्थ राम मंदिरात सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत हा मेळावा होईल. यंदाचा मेळावा हा २७ वा आहे. या मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली या महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि गोवा येथील ६८ तरुण आणि ३९ तरुणींनी नावनोंदणी केली. ही संख्या ऐनवेळेपर्यंत विक्रमी ठरेल, असा विश्वास संयोजन समितीने व्यक्त केला. नोंदणीसंदर्भात अंजली गोरे, दिलीप लाड, छाया खोचे, स्मिता जोशी, अंजली पराडकर, सीमा नांदापूरकर, अंजली देशपांडे, गायत्री न्यायाधीश, डॉ. मयूरी कुलकर्णी, ॲड. अश्विनी कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, मोहन काळे, स्मिता नगरकर, नंदू अदवंत, सुरेखा पारवेकर, सुभाष जोशी, कालिदास त्रिवेदी, वैभव जोशी यांच्याशी २० ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com