
बजाजनगर : बजाजनगरमधील जयभवानी चौकात शनिवारी (ता. बारा) सायंकाळी पाचच्या सुमारास घराच्या अंगणात खेळत असलेल्या १० वर्षीय मुलीला दोन अनोळखी तरुणांनी दुचाकीवर बसवत, तिचे जबरदस्तीने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीने अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेत स्वतःची सुटका केली.