Chh. Sambhajinagar: छातीवर वार होऊनही वडिलांना वाचविण्यासाठी काढली दुचाकी! प्लॉटच्या वादातून अख्ख्या कुटुंबावर झाला होता हल्ला
Crime News: छत्रपती संभाजीनगरात प्लॉटच्या वादातून झालेल्या हल्ल्यात प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झाला. जखमी मुलगा रुद्रने स्वतःच्या जखमा दुर्लक्षून वडिलांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
छत्रपती संभाजीनगर : आरोपींनी सोळा वर्षांच्या रुद्रच्या छातीवर वार केले होते. परंतु, स्वतःवर झालेल्या वारांची पर्वा न करता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडील प्रमोद यांना वाचविण्यासाठी त्याने घरातून चावी आणत थेट आपली दुचाकी काढली.