"औरंगजेबाने 52 वर्षे अखंड हिंदुस्तानवर राज्य केलंय, ते माझे आदर्श"; BRS नेत्याचं वादग्रस्त विधान

छत्रपती संभाजीनगर येथील बीआरएस नेते कादीर मौलाना यांनी हे वक्तव्य केलं आहे.
BRS Leader
BRS LeaderSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील एका बीआरएसच्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं असून अखंड हिंदुस्तानवर ५२ वर्षे राज्य करणारा औरंगजेब माझा आदर्श असल्याचं म्हटलं आहे. बीआरएस नेते कादीर मौलाना असं त्यांचं नाव असून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

BRS Leader
Ajit Pawar-Praful Patel यांच्यात अनऑफिशियल कुजबूज पण माईक सुरूच होता; नेमकं काय म्हणाले...

"औरंगजेब असा बादशाह आहे ज्याने ५२ वर्षे अखंड हिंदुस्तानवर राज्य केले त्या औरंगजेबाचे फोटो स्टेटसला लावल्यावरून राज्याची माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री फडणवीस औरंग्याच्या औलादी असं बोलतात, ते काय बोलतात त्यांना कुणी रोखत का नाही, हिंदूंना ते समजायला पाहिजे, अशा खोट्या गप्पा करून ते काय सिद्ध करणार आहेत.

मी तर औरंगजेबाला आदर्श मानतो. त्यांनी हिंदुस्तानवर राज्य केलंय ते माझे आदर्श आहेत. ज्यावेळी त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्या खिशामध्ये दफनासाठी लागेल एवढेच पैसे होते. जगात असा नेता मी पाहिला नाही." असं वादग्रस्त वक्तव्य छत्रपती संभाजीनगर येथील बीआरएसचे नेते कादीर मौलाना यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

BRS Leader
Sharad Pawar : अजित पवार गटाचा 'गद्दार' असा उल्लेख; शरद पवारांच्या बैठकीपूर्वी दिल्लीत झळकले बॅनर

दरम्यान, राज्यात काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचे फोटो स्टेटसला लावण्यावरून वाद पेटला होता. अकोला, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर येथे या घटनेचे पडसाद उमटले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "औरंग्याच्या औलादी ठिकठिकाणी तयार झाल्या आहेत" असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन प्रकाश आंबेडकर यांनी घेतल्यामुळेही राजकीय वर्तुळातून बरीच टीका करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.