esakal | तरुणावर प्राणघातक हल्ला, घाटीत उपचारासाठी दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

तरुणावर प्राणघातक हल्ला, घाटीत उपचारासाठी दाखल

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : लघुशंकेसाठी जाणाऱ्या तरुणावर मागील वादातून दोघांनी चाकुहल्ला चढवत गंभीर जखमी केले. ही खळबळजनक घटना बुधवारी (ता.२१) मध्यरात्री गोलवाडी टोलनाक्याजवळ घडली. या चाकुहल्ल्यात (Aurangabad) अजय तळणकर हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. गणेश पठारे (रा. बेगमपुरा) आणि कपूर सलामपुरे (रा. गोलवाडी) असे हल्लेखोरांचे नाव आहे. तीसगाव शिवारातील शुभम गाडगे (रा. म्हाडा कॉलनी) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मित्र प्रलय बोदले, मनेश गाडे, अजय तळणकर, आनंद भालेराव आणि ऋषी काटकर असे बुधवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास कारने (एमएच-१४-डीएन-८३५४) तीसगाव, म्हाडा कॉलनीतून शहराकडे जात होते. त्यावेळी अजय कार चालवत होता. दरम्यान, गोलवाडी टोलनाक्याजवळ अजय हा लघुशंकेसाठी कारमधून (Brutal Attack) खाली उतरला. त्याचवेळी तेथे आलेल्या दोघांनी अजयला शिवीगाळ सुरु केली. तसेच १९ जुलै रोजी रात्री दीडच्या सुमारास ‘तुच आमच्यासोबत भांडण करून निघून गेला होता’,असे म्हणत एकाने अजयच्या कानशिलात लगावली. (brutal attack with knife on youth in aurangabad glp88)

हेही वाचा: PHOTO - पावसाचं रौद्ररुप; चिपळूणात ढगफुटी, जनजीवन विस्कळीत

त्याला प्रत्यूत्तर देत अजयने देखील त्याला मारले. त्यातून दोघेही एकमेकांच्या शर्टची कॉलर धरुन हाणामारी करु लागले. हा प्रकार पाहून शुभमसह त्याचे पाचही मित्र कारमधून खाली उतरले. यावेळी अन्य एकाने अजयला शिवीगाळ करुन त्याच्या छातीखाली व पोटावर उजव्या बाजूला चाकुने वार केला. या हल्ल्यात अजय रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. हे पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. त्यामुळे नाक्यावरील कर्मचारी धावून आले. हा प्रकार घडताच गणेश पठारे आणि कपूर सलामपुरे यांनी पळ काढला. त्यानंतर अजयला तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोघांविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन वायाळ करित आहेत.

loading image