
छत्रपती संभाजीनगर : बुलढाणा येथील एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटातील गर्भाच्या पोटातही गर्भ असल्याचे समोर आले आहे. या महिलेला प्रसूतीसाठी घाटी रुग्णालयात आणले जाणार असल्याने प्रसूती विभागात तयारी करण्यात आली, पण बुधवारीदिवसभर ही महिला घाटीत आलीच नाही.