
बजाजनगर : काहीजण उद्योग-व्यवसायासाठी कर्ज घेतात; पण त्याचा सदुपयोग करण्याऐवजी कर्जाच्या मंजुरीनंतर पहिला हप्ता हातात आला, की स्वतःला फोर व्हिलर, मुलासाठी गाडी आणि पत्नीसाठी सोन्याच्या बांगड्या घेतात! नंतर दुसरा हप्ता मिळण्यात अडचणी येतात, अशा शब्दांत पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी कर्जातून उद्योग उभे न करता, सुखसोयींसाठी खर्च करणाऱ्यांचे कान टोचले!