शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा,आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा,आमदार सतीश चव्हाण यांची मागणी
Published on
शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याचा आदेश रद्द करा : आमदार चव्हाण गंगापूर, ता. १६ (बातमीदार) : मुख्यालयी न राहणाऱ्या गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील १,०४६ शिक्षकांची एक वार्षिक वेतनवाढ पुढील तीन वर्षांसाठी बंद करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढला आहे. हा अन्यायकारक आदेश तातडीने रद्द करावा, अशी आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आमदार चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे, की शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यापूर्वी त्यांना शासकीय निवासस्थाने आणि आवश्यक भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. राज्यात विधानसभेचे २८८ मतदारसंघ असताना केवळ गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील शिक्षकांनाच लक्ष्य करणे चुकीचे आहे. शिक्षक वेळेवर उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना, केवळ मुख्यालयी राहत नाहीत म्हणून तीन वर्षांची वेतनवाढ रोखणे हा समस्येवर उपाय असू शकत नाही. सोईसुविधा न पुरवता थेट दंडात्मक कारवाई करणे शिक्षणव्यवस्थेचा कणा असलेल्या शिक्षकांवर अन्याय करणारे आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून तालुक्यातील शाळांच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होईल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com