‘रामलिंग’ वाघाला तातडीने

‘रामलिंग’ वाघाला तातडीने
Published on: 
शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या वाघाला जेरबंद करा : धस आष्टी, ता. ८ (बातमीदार) : तालुक्यातील लोखंडवाडी परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी देविदास टकले यांचा शनिवारी (ता. सात) मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. यापूर्वीही याच वाघाच्या हल्ल्यात राजेंद्र गोल्हार या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाघाचा माग काढण्यासाठी परिसरात तातडीने ट्रॅप कॅमेरे लावावेत, गस्त वाढवावी आणि रेस्क्यू टीम तैनात करून वाघाला पकडण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत दौलावडगाव जिल्हा परिषद गट आणि देवळाली पंचायत समिती गणातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन आमदार धस यांनी केले आहे. मृत देविदास टकले यांच्या शोकाकुल कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे धस यांनी सांगितले. तसेच, आष्टी तालुक्यात तीव्र होत असलेला जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लक्षात घेता दिवाळीनंतर तातडीने चारा छावण्या सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.