कौशल्यातून आत्मविश्वास, प्रयत्नांतून करिअरची दिशा - देशमुख

कौशल्यातून आत्मविश्वास, प्रयत्नांतून करिअरची दिशा - देशमुख
Published on: 
फोटो : WAS26A02964 वाशी ः येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी प्रताप देशमुख, मच्छिंद्र कवडे, डॉ. रामेश्वर कोठावळे आणि प्रा. श्यामसुंदर डोके. ‘कौशल्यातून आत्मविश्वास, प्रयत्नांतून करिअरची दिशा’ वाशी, ता. २७ (बातमीदार) : विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत लेखन, संभाषण आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या कौशल्यांकडे लक्ष द्यावे. बँकिंग, नौदल, हवाई दलासह विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी असून, विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन शहीद भगतसिंग करिअर अकॅडमीचे संचालक प्रताप देशमुख यांनी केले. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ‘विद्यार्थी समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन’ विषयावर सोमवारी (ता. २६) एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे होते. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मच्छिंद्र कवडे, संयोजक प्रा. श्यामसुंदर डोके उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. विश्वास चौधरी यांनी व्यक्तिमत्त्व विकास, तर प्रा. डॉ. आनंद करडे यांनी स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. प्रा. अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आवडीनुसार करिअर निवडण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक प्रा. डोके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. जयप्रकाश चोरघडे यांनी केले, तर प्रा. महादेव उंदरे यांनी आभार मानले. ............................ KLL26B10952 कळंब ः शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ता पवार, उपाध्यक्ष सुनील बोरकर यांचा सत्कार करताना शिक्षक व पदाधिकारी. शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दत्ता पवार उपाध्यक्षपदी सुनील बोरकर, नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार कळंब, ता. २७ (बातमीदार) : कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पवार यांची, तर उपाध्यक्षपदी सुनील बोरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे आणि उपाध्यक्ष भागवत जाधवर यांनी राजीनामे दिल्याने ही पदे रिक्त झाली होती. रविवारी (ता. २६) शिक्षक भवन येथे अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक बालाजी सावतर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी दत्तात्रय आश्रुबा पवार यांच्या नावाची सूचना रवींद्र शिनगारे यांनी केली, तर वैशाली क्षीरसागर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी सुनील सुभाष बोरकर यांच्या नावाची सूचना भागवत जाधवर यांनी केली. ज्योती ढेपे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली. शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या या पतसंस्थेचे नेतृत्व तांबारे यांनी २२ वर्षे केले. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष देशपांडे, भक्तराज दिवाने, विठ्ठल माने, अनिल बारकुल, सचिव संतोष ठोंबरे यांच्यासह संचालक व शिक्षक उपस्थित होते. ....................... शेतातील सौरऊर्जा मोटार, केबल चोरी; हजारोंचे नुकसान कळंब, ता. २७ (बातमीदार) : वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील शेतातील विहिरीवर बसविलेली सौरऊर्जेची मोटार आणि केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या घटनेत शेतकरी मनोज विष्णू घोलप यांचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोलप यांच्या गट क्रमांक ४३३ मधील शेतातील विहिरीवर ओसवाल कंपनीची तीन अश्वशक्ती क्षमतेची सौरऊर्जा मोटार बसविण्यात आली होती. २० हजार रुपये किमतीची मोटार आणि ५० फूट केबल असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. २५ ऑक्टोबरला पहाटे पाचपासून २६ ऑक्टोबर रोजी सकाळी आठपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मनोज घोलप यांनी २६ ऑक्टोबरला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेतातील साहित्य चोरीला गेल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. .......................... OSM26B07287 येडशी ः येथील शहाजीराजे चौकात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मान्यवर. येडशीत महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात येडशी, ता. २७ (बातमीदार) : येथील शहाजीराजे चौकात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्र कोळी समाज संघाचे धाराशिव तालुकाध्यक्ष नीलेश तपसे, जिल्हा परिषद सदस्य संजय लोखंडे, विजयकुमार सस्ते, उपसरपंच सुनील शेळके, अमोल पवार, जयंत भोसले, नीलेश देशमुख, आकाश आकुसकर, रूपेश तपसे, सूरज कांबळे, शैलेश तपसे, स्वप्नील आकुसकर, किरण आकुसकर, संकेत आकुसकर, संदीप आकुसकर आणि कुनाल आकुसकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रतिमापूजन आणि पुष्पहार अर्पण करून महर्षी वाल्मिकी यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com