Theft Crime : डॉलरसह रोख रकमेची चोरी; सिडको एन-१ मध्ये घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

Chh. SambhajiNagar : सिडको एन-१ येथे व्यापाऱ्याच्या घरात घरफोडी करत चोरट्यांनी सुमारे ६ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास केला. यात रोख रक्कम व डॉलर्सचा समावेश आहे.
Theft Crime
Theft Crimesakal
Updated on

सिडको : कामानिमित्त मुंबईला गेलेल्या व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी ४ लाख ६० हजारांच्या रोख रकमेसह १ लाख ५२ हजारांचे डॉलर, घड्याळ असा सुमारे ६ लाख ४० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही चोरी ता. सहा ते सात एप्रिलदरम्यान एन-१ सिडको येथील ई सेक्टरमध्ये घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com