
छत्रपती संभाजीनगर : नवीन शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा ९ जून; तर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर पुन्हा गणवेशातील विद्यार्थी आणि घंटांचा आवाज शाळांमध्ये ऐकू येणार आहेत.