सणासुदीच्या गर्दीत तिसरा डोळा बंद

सणासुदीच्या गर्दीत तिसरा डोळा बंद
Published on
((एक मेन)) ---- सीसीटीव्हीची ‘नजर’ गायब ---- - शहरातील बहुतांश कॅमेरे नादुरुस्त - पोलिस बंदोबस्तावरच सुरक्षेची मदार ------- सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ९ : गणेशोत्सवासह आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा खरेदीदारांच्या गर्दीने फुलल्या आहेत. मात्र, अशा गर्दीच्या आणि संवेदनशील काळात शहराच्या सुरक्षेचा महत्त्वाचा आधार मानली जाणारी सीसीटीव्ही यंत्रणाच कोलमडल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख चौक, मध्यवर्ती बसस्थानक तसेच गर्दीच्या बाजारपेठांमध्ये अनेक सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त आहेत, तर काही ठिकाणी अद्याप कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ऐन उत्सवाच्या काळात शहराच्या सुरक्षेची मदार पोलिसांच्या प्रत्यक्ष बंदोबस्तावरच राहणार आहे. नेहरू चौक, सुभाष चौक, सराफा ओळ, कापड बाजार आणि बसस्थानक परिसरात दररोज हजारो नागरिक खरेदीसाठी येतात. गर्दीचा गैरफायदा घेत पाकीटमारी, दागिने चोरी, महिलांची छेडछाड तसेच वाहनचोरीसारखे प्रकार घडण्याची शक्यता असते. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याबरोबरच एखादी घटना घडल्यानंतर तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरते. मात्र, कॅमेरे बंद अथवा नादुरुस्त असल्याने पोलिसांना स्थानिक व्यापारी आणि नागरिकांच्या खासगी सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून राहावे लागत आहे. ------ मंडळांना स्वखर्चाने कॅमेरे बसविण्याच्या सूचना प्रशासनाच्या बैठकीत गणेश मंडळे व उत्सव आयोजकांना सुरक्षेच्या दृष्टीने मंडप परिसरात स्वखर्चाने सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, शहरातील प्रमुख चौक, प्रवेशद्वारे, उड्डाणपूल आणि संवेदनशील ठिकाणी कायमस्वरूपी सीसीटीव्ही जाळे उभारण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. कॅमेऱ्यांचा अभाव असल्याने पोलिसांना गस्त वाढवावी लागणार आहे. -- साध्या गणवेशातील पोलिस, दामिनी पथकावर भार सीसीटीव्हीची नजर नसल्याने पोलिसांना मानवी यंत्रणेवर अधिक भर द्यावा लागणार आहे. बाजारपेठांमध्ये तसेच गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये साध्या गणवेशातील पोलिसांची नियुक्ती, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची तैनाती, फिक्स पॉइंट आणि रात्रंदिवस मोबाइल पेट्रोलिंगवर भर देण्याची आवश्यकता आहे. ---- ((कोट)) सणासुदीच्या काळात शहरात सीसीटीव्हीची डिजिटल नजर असणे अत्यंत गरजेचे आहे. मंडळांना त्यांच्या पातळीवर सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, शहरातील मुख्य चौक आणि प्रमुख मार्गांवरील सीसीटीव्हींचे काय? नगर परिषद व पोलिस प्रशासनाने समन्वयाने कायमस्वरूपी आणि अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. - मेहराज शेख, अध्यक्ष, श्री साई परिवार गणेश मंडळ, धाराशिव ------ ((कोट)) शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारणे अपेक्षित आहे. दरम्यान, चोरी, सोनसाखळी हिसकावणे, महिलांची छेडछाड तसेच इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस कर्मचारी आणि दामिनी पथक तैनात करण्यात येणार आहे. - रवींद्र खांडेकर, पोलिस निरीक्षक, आनंदनगर पोलिस ठाणे, धाराशिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com