
कन्नड : झाड घरावर पडेल, झाडाच्या सावलीमुळे पीक येणार नाही, अशा कारणांवरून अनेकदा मोठमोठी झाडे सर्रासपणे तोडली जातात. मात्र, कन्नड तालुक्यातील औराळा येथील पाडुरंग शिंदे यांनी हेअर सलूनसमोर पाच वर्षांपूर्वी लावलेल्या कडुनिंबाच्या झाडाचा पाचवा वाढदिवस शनिवारी (ता. १७) केक कापून साजरा केला.