छत्रपती संभाजीनगर - फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव येथील आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी12 वी च्या परीक्षेदरम्यान शनिवारी (ता.२२) गणित विषयाचा पेपर सुरू असताना मास कॉपी झाल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी शाळेच्या संपूर्ण प्रशासनाविरोधात पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
12 वी ची परीक्षा कॉपी मुक्त आणि भय मुक्त पार पडाव्यात यासाठी प्रशासन विशेष अभियान राबवित असून यासाठी वेगवेगळे बैठे आणि भरारी पथके नेमण्यात आले आहेत. दरम्यान, शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपळगाव वळण (ता. फुलंब्री) येथील आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात गणित विषयाचा पेपर सुरू असताना जिल्हा परीषदेचे सीईओ विकास मीना यांनी धाड टाकली.
यावेळी एक बॉक्स भरुन कॉप्या, अनेक गाईड्स वर्गात आढळून आले. अनेक जणांनी सीईओंना पाहिल्यानंतर वर्गाच्या बाहेर धूम ठोकली. परीक्षा हॉलच्या खिडक्यांमधून अक्षरशः कॉप्यांचा पाऊस पडत होता. यामध्ये शाळेचे केंद्रसंचालकापासून सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश सीईओ मीना यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे मास कॉपी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कॉपी करणाऱ्यांची कोणतीही गय होणार नसल्याचे सीईओ विकास मीना यांनी म्हटले आहे.
परीक्षा वादात...
दहावीची परीक्षा पहिल्या दिवसापासून वादात सापडली आहे. जालना व यवतमाळ येथे मराठीच्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी कॉपी प्रकरणे व पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर शनिवारी (ता.२२) बारावीच्या गणिताच्या पेपरमध्येही असाच प्रकार समोर आला आहे.
सीईओ विकास मिना यांनी पिंपळगाव येथील परीक्षा केंद्रावरुन ढिगभर कॉपी जमा केल्या. एखाद दुसरा अपवाद वगळाता बहुतांश विद्यार्थ्यांकडे कॉपी सापडल्याने सिईओंनी कॉप्यांचा पंचनामा करून शिक्षण विभागाला शाळेवर कारवाईचे आदेश दिले आहे. तसेच मान्यता रद्द करण्यासंदर्भातही कारवाई या केंद्रावर होणार असल्याचे सीईओ मिना यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.