वाळूजमधील सीजी पॉवरचे उत्पादन करण्याचे निर्देश

वाळूजमधील सीजी पॉवरचे 
उत्पादन करण्याचे निर्देश
Published on: 
वाळूजमधील सीजी पॉवरचे उत्पादन बंद करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईची कंपनीने दिली शेअर बाजाराला माहिती छत्रपती संभाजीनगर, ता. ५ : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडच्या कारखान्यातील सर्व उत्पादन उपक्रम बंद करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) दिले आहेत. जल आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यांच्या कथित उल्लंघनाप्रकरणी मंडळाने ही कारवाई केली आहे. कंपनीने गुरुवारी (ता. पाच) मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला (एनएसई) पत्राद्वारे याबाबत माहिती दिली. एमपीसीबीने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पत्राद्वारे हे निर्देश जारी केले. कंपनीला हे निर्देश ४ नोव्हेंबरला प्राप्त झाले. वाळूज एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक डी-२, डी१/२ येथे असलेल्या कंपनीच्या युनिटमधील सर्व उत्पादन उपक्रम बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९७४ आणि वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९८१ तसेच त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या आदेशाचा कंपनीच्या आर्थिक कामकाजावर होणारा परिणाम सध्या निश्चित करता येत नसल्याचे खुलाशात म्हटले आहे. त्यामुळे उत्पादन बंदीमुळे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान किंवा कामकाजावरील परिणाम याबाबत कंपनीने कोणताही आकडा जाहीर केलेला नाही. ----- कंपनीकडून आदेशाचा आढावा कंपनीचे सचिव आणि अनुपालन अधिकारी संजय कुमार चौधरी यांनी ५ नोव्हेंबर रोजी शेअर बाजाराला पाठविलेल्या पत्रात कंपनीची भूमिका स्पष्ट केली आहे. पर्यावरणविषयक लागू कायदे आणि नियमांचे पालन करण्यास कंपनी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एमपीसीबीच्या निर्देशांचा आढावा घेतला जात असून, त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही कंपनीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.