AIFF Event Discussion
sakal
छत्रपती संभाजीनगर - ‘मराठी सिनेमा आशयाच्या पातळीवर समृद्ध होत असताना मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. भविष्यकाळ आशादायक आहे’, असा प्रातिनिधिक सूर अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. २९) झालेल्या ‘मराठी चित्रपटांचा बदलता चेहरा’ या परिसंवादात सहभागी वक्त्यांच्या विचारांतून उमटला.